धमाकेदार पन्नास

क्रिकेटचा देव म्हणून संपूर्ण जग ज्याची पूजा करतं असा मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर २४ एप्रिलला आयुष्याची ‘अर्धशतकी खेळी’ पूर्ण करत आहे. या निमित्ताने पाहूया सचिनबद्दलच्या काही रंजक गोष्टी : सचिनच्या वडिलांनी प्रसिद्ध संगीतकार एस.डी. बर्मन यांच्या नावावरून आपल्या आपल्या मुलाचं ‘सचिन’ असे ठेवलं. वयाच्या १४ व्या वर्षी सचिनने रणजी सामान्यांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि […]

धमाकेदार पन्नास

क्रिकेटचा देव म्हणून संपूर्ण जग ज्याची पूजा करतं असा मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर २४ एप्रिलला आयुष्याची ‘अर्धशतकी खेळी’ पूर्ण करत आहे.

या निमित्ताने पाहूया सचिनबद्दलच्या काही रंजक गोष्टी :

सचिनच्या वडिलांनी प्रसिद्ध संगीतकार एस.डी. बर्मन यांच्या नावावरून आपल्या आपल्या मुलाचं ‘सचिन’ असे ठेवलं.


वयाच्या १४ व्या वर्षी सचिनने रणजी सामान्यांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे रणजी सामन्यामध्ये खेळणारा सचिन आजवरचा सर्वात तरुण खेळाडू आहे.


सचिनला वेगवान गोलंदाज म्हणून नावलौकिक मिळवायचा होता, पण दुर्दैवाने त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहिले.


सचिन जरी उजव्या हाताने फलंदाजी (बॅटिंग) आणि गोलंदाजी (बॉलिंग) करत असला तरी सचिन लिखाण मात्र डाव्या हातानेच करतो.


क्रिकेट सामन्यात संघ विजयी नसतानादेखील सचिनच्या नावी सहा वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकवण्याचा विक्रम कोरला आहे.


वयाची २० वर्षे पूर्ण होईपर्यंत सचिनने कसोटी कारकिर्दीमध्ये ५ शतके ठोकून विश्वविक्रम रचला आहे.


जागतिक विश्वचषक क्रिकेट सामन्यात २००० धावा करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे.


सचिन काहीसा अंधश्रद्धाळू आहे. हे सिद्ध करणारा एक प्रसंग म्हणजे – फिरोजशहा कोटलावर पाकिस्तान विरुद्ध सामन्यात अनिल कुंबळेने १० विकेट्स पटकावत विक्रम घडवला होता, तेव्हा सचिनने प्रत्येक वेळी कुंबळेची ओव्हर सुरु होण्यापूर्वी कुंबळेचे स्वेटर आणि कॅप काढून अम्पायरकडे सोपवले होते. आणि नवल असं की कुंबळेने त्या वेळेस सलग १० विकेट घेतल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number