आव्हाडांच्या पत्नीला अतिरेकी लादेनचं कौतुक

राशपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांना अतिरेकी ओसामा बिन लादेन याच्याविषयी कौतुक वाटते.

आव्हाडांच्या पत्नीला अतिरेकी लादेनचं कौतुक

मुंब्रा : राशपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांना अतिरेकी ओसामा बिन लादेन याच्याविषयी कौतुक वाटते. ऋता आव्हाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाषण करत असलेल्या ऋता आव्हाड ओसामा बिन लादेनविषयी कौतुकाने बोलताना दिसत आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न पुरस्काराने गौरविलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची तुलना ऋता आव्हाड यांनी अतिरेकी ओसामा बिन लादेन याच्याशी केली आहे.

अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्रांवर विमानांच्या मदतीने आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लपून बसलेल्या अतिरेकी लादेन आणि त्याच्या समर्थकांवर हल्ले केले. अमेरिकेच्या कारवाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी लादेन पाकिस्तानमधील ॲबोटाबाद येथे जाऊन लपला. अखेर अमेरिकेने कमांडो कारवाई करुन लादेनला ठार केले होते. याउलट कलाम यांना भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. वाजपेयी सरकारच्या काळात कलाम मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव असताना भारताने तीन दिवसांत अणुबॉम्बच्या पाच यशस्वी चाचण्या घेतल्या होत्या. यात दोन हायड्रोजन बॉम्ब होते. एवढी मोठी कामगिरी करणाऱ्या कलामांची तुलना ऋता आव्हाड यांनी अतिरेकी ओसामा बिन लादेन याच्याशी केली. यावरुन समाजमाध्यमात चर्चेला उधाण आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number