युक्रेनवरील हल्ल्याला रशियाच्या वृत्तवाहिनीचा निषेध

रशिया-युक्रेन युद्धाचा आज वीसावा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. अशातच, युक्रेनवरील हल्ल्याचा रशियाच्या वृत्तवाहिनीच्या संपादिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या चॅनल वन वृ्त्तवाहिनीच्या एका कर्मचाऱ्याने रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविरुद्ध निषेध करत वृ्त्तवाहिनीच्या मुख्य कार्यक्रमात व्यत्यय आणला. चॅनल वनच्या […]

युक्रेनवरील हल्ल्याला रशियाच्या वृत्तवाहिनीचा निषेध

रशिया-युक्रेन युद्धाचा आज वीसावा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. अशातच, युक्रेनवरील हल्ल्याचा रशियाच्या वृत्तवाहिनीच्या संपादिकेने निषेध नोंदवला आहे.

रशियाच्या चॅनल वन वृ्त्तवाहिनीच्या एका कर्मचाऱ्याने रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविरुद्ध निषेध करत वृ्त्तवाहिनीच्या मुख्य कार्यक्रमात व्यत्यय आणला. चॅनल वनच्या संपादिका मरीना यांनी सोमवारी रात्रीच्या बातम्यांच्या थेट प्रसारणाच्या सेटवर येऊन ओरडत ‘युद्ध थांबवा. युद्धाला नाही म्हणा असा बॅनर झळकवला.’ व्यत्यय आणल्यानंतरही न्यूज अँकर बातमी वाचत होती. मात्र कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळे मारिया यांनी केलेला निषेध काही सेकंदांपर्यंत वृत्त वाहिनीवर पाहिला गेला. चॅनल वनच्या संपादिका मरीना यांच्या कृत्यामुळे त्यांना मॉस्कोमध्ये अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number