राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीयवर्तूळातून संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे त्यांच्या अपघातामागील कारण जाणून घेण्यासाठी कसून तपास सुरु आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता तपासाला वेग आला आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानातला फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, त्यातील डेटा रेकॉर्ड करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांचा घात की अपघात? असा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.
यावेळी रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, “अपघात की घात आहे याचे पुरावे आम्ही सातत्याने मागत आहोत. 20 दिवस झाले आम्हाला कुठलही फुटेज मिळत नाहीत. आम्हाला सगळी माहिती हवी आहे. मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिला आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की सगळं अहवाल तयार करून तुमच्या समोर मांडू… काल कळलं की ब्लॅक box देशाच्या बाहेर जाणार आहे हे चुकीचे आहे… आम्हाला राजकारण नकोय आम्हाला सत्य समोर येणं गरजेचं आहे… एवढे दिवस झाले फुटेज येत नसतील तर, आम्ही देखील काही तपास करत आहोत… काही गोष्टी भयान आहेत.. आम्हाला फक्त आरोप करायचे नाहीत… पुराव्यासहित अहवाल आमच्यासमोर ठेवा तरच आम्हाला कळेल की अजितदादांचा घात आहे की अपघात… आमची सगळ्यांची इच्छा आहे सत्य समोर याव… सत्य समोर येत नाही तेव्हा ते खोटं वाटायला लागत.. आम्ही संयम ठेवला आहे… आम्हाला गा…ची अवलाद समजू नये… जे काही सत्य आहे ते समोर ठेवण्यात यावं… ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा असतो तो बाहेर का पाठवला जातोय… ब्लॅक box खरंच जळाला आहे का? आता तर तो परदेशात पाठवला तर त्याला देखील वीस दिवस लागणार… या गोष्टी वाढत आहेत म्हणून संशय येत आहे… एवढा वेळ लागत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे… दादांच्या मृत्यूचा अहवाल यायला एवढा वेळ लागलं चुकीचं…”
हेही वाचा- Rohit Pawar : “ब्लॅक बॉक्स जळला कसा? आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम…”, रोहित पवार विलिनीकरणावर स्पष्टच बोलले
“त्यांनी काय पत्रकार परिषद घेतली हा त्यांचा विषय आहे. कुणीही पत्रकार परिषद घेऊ द्या. ते जे बोलले आणि ते विषय जर तपास यंत्रणला मॅच होणार असतील तर त्याला देखील गृहीत धरा व आमचं काही म्हणणं नाही पण सत्यसमोर येऊ द्या. आमच्याच नेत्यांवरती जर आरोप करायचे असतील तर आमच्याकडे देखील पुरावे आहेत. पुरावे तातडीने समोर आणावेत. सक्षम यंत्रणेने काम करावे. रोहित पवार यांनी काही सांगितलं असेल आणि जर त्यातून सुट्टी बाहेर येत असेल तर तोही तपासून आवश्यक… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे की ज्या ज्या चौकशा करायच्या आहेत त्या सगळ्या चौकशी करू तपास करू आणि अहवाल तुमच्यासमोर ठेवू. आमचे काही नेते, कार्यकर्ते पदाधिकारी द्विदा भूमिकेत आहेत त्यांना मला सांगायचं आहे आपल्याला ज्या माणसाने उभं केलं आणि आता त्यांच्यानंतर आपल्याला कोण सांभाळेल आपल्याला कोण उभा करेल म्हणून आपण शांत बसायचं आणि सत्यसमोर येत नसेल तरी समर्थ बसायचं त्यातली मी नाही”.
हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash Update: अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डर्सवर आगीचा परिणाम; परदेशातील तंत्रज्ञांच्या मदतीने उलगडणार विमानातील शेवटच्या क्षणांचं सत्य
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, “अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घ्यावी किंवा चटई टाकून प्रेस ऑफिस समोर झोपावे… सगळी चौकशी संविधानाने होईल… दमानिया संविधान आहेत का? त्या न्यायाधीश आहेत का? त्या फक्त सुपारी घेऊन आरोप करतात… त्या न्यायालयात का जात नाहीत कारण त्यांच्याकडे पुरावे नाहीत… कोर्ट यांना थारा देत नाही… त्यांनी कितीही ओरडलं तरी हे राज्य कायद्याने चालणार… पार्थ पवार यांचा कायद्याने कुठलाही संबंध येत नाही… अंजली दमानिया यांनी नावाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून पांघरून घेतला आहे पाठीमागून राजकीय लोकांसाठी काम करतात… त्यांना कायद्याचं ज्ञान आहे का? अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निरर्थक…”
पुण्याच्या महापौर विषयी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, “पुण्याच्या महापौर या 3 वर्षांनंतर बसल्या आहेत. भाजप जिंकून तुमच्या महापौर बिनविरोध झाला आहेत. पुण्याच्या महापौर आहेत पक्षाच्या कार्यकर्तासारखं वागणं गैर. आंदोलनात त्यांनी सामील होणं योग्य नाही. त्या पुण्याच्या महापौर आहेत. आंदोलनात जाणं कायद्याने चुकीचे. त्यांनी पुण्याची गरीमा घातली. हे अशोभनीय आहे. तुम्ही आता पक्षाच्या नाहीत. त्या तिथ गेल्या म्हणून मी त्यांना ठणकावून सांगितलं. आता परत अस होऊ नये म्हणून सांगितलं की भाजप नेत्यांनी यांचा क्लास घेणं गरजेचं आहे. त्या दिवशी भाजपने पात्रता घालवली. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पुन्हा होऊच शकत नाही”.