Rupali Chakankar: भोंदू खरात प्रकरणात चाकणकर अडचणीत! SIT कडून समन्स, राजकारणात खळबळ

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून SIT कडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे त्यांच्या चौकशीची शक्यता निर्माण झाली आहे

Rupali Chakankar: भोंदू खरात प्रकरणात चाकणकर अडचणीत! SIT कडून समन्स, राजकारणात खळबळ

अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना आता विशेष तपास पथकाने (SIT) त्यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पहिल्यांदाच एका राजकीय व्यक्तीची अधिकृत चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याआधी या वादाच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी दोन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला होता. प्रथम त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला, त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींनंतर आता चौकशीचा फेरा त्यांच्या भोवती अधिक घट्ट होत असल्याचे चित्र आहे.

या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही उधाण आले होते. काही विरोधी नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारवरही या प्रकरणात कारवाई करण्यासाठी दबाव वाढला होता.तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी करण्याची तयारी सुरू आहे. संस्थेचे आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींची सखोल तपासणी केली जाणार असून, अनेकांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number