रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद देखील आहे. तसेच त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ यानुसार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून महिला अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होते, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणूकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात अनेकदा शाब्दिक युद्ध पाहण्यास मिळाले.