Rupali Chakankar : मोठी बातमी ! खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले; मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ राजीनाम्याचे आदेश

अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

Rupali Chakankar : मोठी बातमी ! खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले; मुख्यमंत्र्यांकडून  तात्काळ राजीनाम्याचे आदेश

नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाला महिलांचे शोषण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून यामुळे राजकारणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रकणावर अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. तसेच राज्यभरात रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा- Nashik Ashok Kharat Case: खरातचे कारनामे उघड करणाारा पोलिसांच्या ताब्यात; नराधम अशोक खरातची संपत्ती किती? h

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number