लोकसभेच्या वाटपाबद्दल अफवा – विजय वडेट्टीवार

लोकसभा निवडणुकीसाठी मविआ एकत्र निवडणूक लढवणार आहे. तर, मविआचे लोकसभेच्या जागा वाटपाचे सूत्र ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल अफवा पसरवण्यात आली असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडी घटक पक्षाची बैठक […]

लोकसभेच्या वाटपाबद्दल अफवा – विजय वडेट्टीवार

लोकसभा निवडणुकीसाठी मविआ एकत्र निवडणूक लढवणार आहे. तर, मविआचे लोकसभेच्या जागा वाटपाचे सूत्र ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल अफवा पसरवण्यात आली असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडी घटक पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मविआचे लोकसभेच्या जागा वाटप ठरवण्यात आली असल्याची माहिती समोर आली. मात्र, लोकसभेच्या वाटपाबद्दल अफवा असल्याचे विजय वडेट्टीवार म्हटले आहेत. मविआच्या बैठकीत जागा वाटपाबद्दल चर्चा झाली नसल्याचे वडेट्टीवर म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांच्या मनोमिलन व्हावं यासाठी मविआची बैठक घेतली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव गटाला 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 तर काँग्रेसला 8 जागा देण्यात आल्या. मुंबईत लोकसभेच्या 6 जागा आहेत. त्यापैकी 4 जागा ठाकरे गट लढवणार आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात ठाकरे गट निवडणूक लढवणार आहेत. तर, ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी आणि उत्तर मुंबईतून काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.

मात्र, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूकीत मविआच्या जागा वाटपाबाबत अफवा पसरवली असल्याचे सांगितले आहे. तसेच, मविआच्या बैठकीत जागा वाटपाबद्दल चर्चा झाली नसल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number