Rohit Sharma Captaincy Controversy | ‘या’ तीन कारणांमुळे रोहित शर्माला गमवावं लागलं कर्णधारपद

शुभमन गिलला भारतीय एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुतक्त करण्यात आलं. तर, रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. रोहितच्या हकालपट्टीमागची 'ही' तीन मुख्य करणं होती.

Rohit Sharma Captaincy Controversy | ‘या’ तीन कारणांमुळे रोहित शर्माला गमवावं लागलं कर्णधारपद

शुभमन गिल झाला भारतीय एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार, रोहित शर्माचं कर्णधार म्हणून एकदिवस विश्वचषक जिकायचं स्वप्न भंगलं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. क्रिकेटरसिक रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट बघत होते. चाहत्यांची ही इच्छा पूर्णदेखील झाली मात्र रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्याने एका नव्या वादाला तोंड फुटलं. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय काहींना पटला तर काहींना नाही. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याची मुख्य करणं काय होती?  हे आपण जाणून घेणार आहोत. 

1. रोहित शर्माचं वय 
रोहित शर्मा एप्रिल 2025मध्ये 38 वर्षाचा झाला. पुढील एकदिवसीय विश्वचषक 2027मध्ये आहे. 2027मध्ये रोहित शर्माचं वय 40 असेल. अधिकतर खेळाडू वयाच्या पस्तिशीनंतर निवृत्तीचा विचार करतात. रोहित शर्मा अजून किती वर्ष खेळू शकेल यावर बीसीसीआयला शंका होती.  2027च्या एकदिवसीय विश्वचषकाआधी भारतीय संघ 26 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या 26 सामन्यांमध्ये बरंच अंतरदेखील आहे. त्यामुळे एक खेळाडू (शुभमन गिल) जो तिन्ही फॉरमॅट (कसोटी, एकदिवसीय आणि टी -20) खेळतो त्याला प्राधान्य देण्यात आलं. 

२. रोहित शर्माचा फिटनेस 
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचं मुख्य कारण हे फिटनेस होतं. वयाचा 30 वर्षाचा टप्पा ओलांडल्यावर खेळाडूंचं शरीर बऱ्याचदा साथ सोडतं आणि दुखापत होण्याच्या शक्यतादेखील वाढतात, असं अनेकदा दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला कर्णधारपदी ठेवणं हे संघासाठी धोकादायकदेखील ठरू शकलं असतं. गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर रोहित बऱ्याचदा दुखापतग्रस्त झाला आणि त्याला शस्त्रक्रियेलादेखील सामोरं जावं लागलं. अलिकडे रोहित शर्माने त्याच्या फिटनेसवर काम केलं होतं.  सूत्रांनुसार, अशी माहिती पुढे आलेली की, रोहित शर्माने 7-8 किलो वजनदेखील कमी केलं आहे. रोहित, माजी भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत त्याच्या खेळावर आणि फिटनेसवर काम करताना दिसला होता. मात्र, हे कर्णधारपद टिकवून ठेवण्यास पुरेसं ठरलं नाही. 

3. रोहितची 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीची उपलब्धता
मुख्य निवड्कर्ता अजित आगरकर याने सांगितलं की, 'जेव्हा आम्ही रोहित शर्माला विचारलं की, "तू  2027 मधील एकदिवसीय विश्वचषक निश्चित स्वरूपात खेळणार आहेस का?", असं विचारल्यानंतर रोहितकडून उत्तर आलं की, "याबाबत मी खात्रीने काहीही सांगू शकत नाही". या संवादानंतर अजित आगरकर आणि गौतम गंभीरने शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवायचं या निष्कर्षावर पोहचले. 

रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यासाठी ही तीन मुख्य करणं ठरली. शुभमन गिल 19 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांपासून एकदिवसीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तर 2016 नंतर प्रथमच विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघे भारतीय एकदिवीय संघात मात्र आता खेळाडू म्हणून आपल्याला खेळताना दिसणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number