अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण करण्यासाठी राशपचे आमदार रोहित पवार यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब त्या ठिकाणी उपस्थितीत होते. पोलिसांनी आत जाण्यास रोहित पवार यांना अडवले. त्यानंतर आत जाण्यासाठी रोहित पवार आणि कार्यकर्ते आग्रही असल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.