Rohit Pawar Vidhan Sabha : काकाचा शोकप्रस्ताव, पुतण्या सभागृहात ढसाढसा रडला, काकींना शब्द दिला…

रोहित पवार यांनीदेखील शोकप्रस्ताव मांडला. यावेळी रोहित पवार खूप भावूक झालेले दिसून आले. 

Rohit Pawar Vidhan Sabha : काकाचा शोकप्रस्ताव, पुतण्या सभागृहात ढसाढसा रडला, काकींना शब्द दिला…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरूवात झाली आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस हा अजित पवारांच्या आठवणीत गेलेला दिसून आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडले. याचवेळी रोहित पवार यांनीदेखील शोकप्रस्ताव मांडला. यावेळी रोहित पवार खूप भावूक झालेले दिसून आले. 

यावेळी रोहित पवार म्हणाले की, दादा तुमच्या जाण्याने राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी मला एक मुलगा म्हणून खूप सल्ले दिले. त्यांना माझे वाढलेले केस आवडत नव्हते. त्यावेळी ते म्हणाले रोहित झिपऱ्या काप, त्यांना आदरांजली म्हणून मी माझे केस कापले. मी अजितदादांना शब्द देतो. माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन”. 

हेही वाचा – Jayant Patil on Ajit Pawar : ‘भर सभेत दादांनी आबांना सुनावलं होतं…’, जयंत पाटीलांनी सांगितल्या अजित पवारांबद्दलच्या राजकारणातील जुन्या आठवणी 

पुढे ते म्हणाले की,  वरचं बटण लावत जा असं अजित दादा मला नेहमी म्हणायचे.  पण मात्र मी एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर मी ज्यावेळी अजितदादांना भेटायला जाईन, तोपर्यंत माझ्या शर्टचं बटण असंच उघडं ठेवणार. कारण हे वरचं बटण तुमची मला रोज आठवण देत राहील असं रोहित पवार म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number