राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मध्यांतरी दिल्ली दौरा पार पाडला असून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली असून, हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात उचलून धरण्याची विनंती केली. आतापर्यंत रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले. यानंतर आज माध्यमांसमोर बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातामागे कुणीतरी मोठी व्यक्ती असल्याचे गंभीर वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- Ritu Tawde : महापौर रितू तावडे यांच्या भोवती अडचणींचे सावट; नव्या वादात असतानाच 8 वर्ष जुनं प्रकरणही चर्चे
यावेळी रोहित पवार म्हणाले की, “काल विधानसभा अध्यक्ष यांना भेटून अजित पवार यांच्या अपघाताबाबच चर्चा घ्यावी अशी विनंती केली. आता अध्यक्ष आज 12 वाजता चर्चा होऊ देतात का? हे पहावे लागले. दादांच्या अपघातावर चर्चा जर करत नसतील तर कोणी तरी पावरफुल पर्सन यामागे आहे, असा लोकांमध्ये संशय आहे. आमदारांना बोलूच दिले जात नाही हे दुर्दैव आहे. VSR ला वाचविण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. सीबीआयला प्रस्ताव द्या अशी मागणी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी करावी लागतेय स्मरण पत्र द्यावे लागत आहे. जय पवार पत्रकार परिषद घेणार होते मला आनंद होता की, तो लढतोय तो ट्विट करतो त्याचा फायदा तपासाला होतोय. जय पवारवर कोणाचा दबाव होता म्हणून रद्द केली किंवा अधिक माहीत येत असेल. जय पवारांची पत्रकार परिषद झाली की मी माझी या विषयावर शेवटची पत्रकार परिषद घेईन. राहूल गांधींना भेटलो ते सुद्धा मदत करत आहे त्यांचे कार्यालय माझ्या संपर्कात आहे.”