रोहित पवारांचा दादांच्या राष्ट्रवादीतील तटकरे आणि पटेलांबाबत मोठा खुलासा.
सुनेत्रा पवारांना शह देण्यासाठी आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पाडण्याच्या तटकरे आणि पटेल मोठा डाव टाकणार आहेत. राष्ट्र्रवादीच्या त्या २२ आमदारांना घेऊन तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढणार आहेत. असा मोठा दावा शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी केला आहे. त्यात मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सुद्धा काही आमदारांचा समावेश आहे आणि ते सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहेत असा दावा रोहित पवारांचा आहे.
तटकरे आणि शरद पवारांची भेट आणि ते ट्विट
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शरद पवारांची भेट झाली, तटकरेंनी सिल्वर ओकवर जाऊन पवरांची भेट घेतली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येणार असं लोकांना वाटू लागलं होत पण सुनील तटकरे यांनी ट्विट मध्ये आपण फक्त साहेबांची भेट घेतली त्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, बहुदा माझ्या मनातही असं काही नव्हतं; असं तटकरेंनी भेटीवर स्पष्टीकरण ट्विटच्या माध्यमातून दिलं.
तटकरे आणि पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची टीका
भेटीवर ट्विट करत तटकरेंनी पूर्ण स्पष्टीकरण दिल्यानंतर रोहित पवारांना जेव्हा पत्रकार परिषदेत या भेटीबाबत विचारण्यात आलं तेव्हा रोहित पवारांनी तटकरेंना टोला लगावत म्हणाले की, तटकरेंना सिल्वर ओकवरचा चहा आवडलेला दिसत नाही आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर रोहित पवारांचं स्पष्टीकरण
अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मोठ्या चर्च्या झाल्या पण तटकरे आणि पटेलांचा एकत्र येण्यासाठी विरोध आहे असा आरोप शरद पवारांच्या अनेक आमदार, खासदारांनी केला होता तेव्हा चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने थांबवली आहे असं स्पष्टीकरण शशिकांत शिंदेंनी दिलं. पण आता रोहित पवारांनी विलीनीकरणावर बोलताना भाजपसोबत जोपर्यंत दादांच्या राष्ट्रवादी आहे तो पर्यंत आम्ही एकत्र येण्याचा विचार करणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे .
रोहित पवार नक्की काय म्हणाले?
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल राष्ट्र्वादीत मोठी फूट पाडणार आहेत. राष्ट्रवादीच्या २२ आमदारांना घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार आणि भाजपमधून सर्व निवडणूक लढणार. ईडी आणि सीबीआईच्या भीतीने सर्व भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजपसोबत त्यांची जवळीक वाढत आहेत म्हणून ते सर्व असा निर्णय घेणार . एकनाथ शिंदेंचे सुद्धा काही आमदार भाजपच्या गळाला लागलेले आहेत आणि ते सुद्धा पुढची निवडणूक भाजपमधून लढणार. जो पर्यंत दादांची राष्ट्रवादी भाजपसबत आहेत तो पर्यंत आम्ही एकत्र येणार नाही आणि चर्चा सुद्धा होणार नाही.