Rohit Pawar: "भोंदू खरातला संवपले जाणार?" फेसबुक पोस्टद्वारे प्रश्न विचारात रोहित पवारांनी व्यक्त केली शंका

रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनेवरही लक्ष वेधले आहे.

Rohit Pawar: &quotभोंदू खरातला संवपले जाणार?" फेसबुक पोस्टद्वारे प्रश्न विचारात रोहित पवारांनी व्यक्त केली शंका

मुंबई: नाशिक येथील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण आधीच तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर खळबळजनक आरोप करत म्हटले आहे की, “ खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत.” 

पुढे त्यांनी लिहले आहे, “दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल.” 

हेही वाचा: Thane First Planetarium : शनीची वलये अन् देवयानी दीर्घिका आता डोळ्यांच्या टप्प्यात; शहापूरमध्ये 5 एप्रिलला भव्य तारांगणाचे उद्घाटन

पोस्टमध्ये सरकारवर आरोप करत रोहित पवार यांनी लिहले आहे, “सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय.” 

रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनेवरही लक्ष वेधले आहे. शेवटी सत्य बाहेर यायलाच पाहिजे हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.

दरम्यान, रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून या आरोपांवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

हेही वाचा: Eknath Khadse: कागदपत्रांत खाडाखोड आणि वतन जमिनीचा पेच; एकनाथ खडसेंनी फेटाळले आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number