Rohit Pawar On BJP : ‘भाजप त्यांच्याच मित्र पक्षाची शिकार करणार’; रोहित पवारांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

रोहित पवार यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत महायुतीत अंतर्गत फूट पडण्याचा दावा केला आहे.

Rohit Pawar On BJP : ‘भाजप त्यांच्याच मित्र पक्षाची शिकार करणार’; रोहित पवारांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्याची दिशा कधी बदलेल आणि कोणाची ‘शिकार’ होईल, याचा अंदाज बांधणे राजकीय विश्लेषकांसाठीही कठीण झाले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या वावड्या उठत असताना आणि ठाकरे गटाचे आठ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, आता या वादात एक नवीन आणि अत्यंत स्फोटक वळण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवत एक खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवारांच्या मते, महाराष्ट्रात लवकरच ‘मित्रांकडूनच मित्रांची शिकार’ होण्याचे नाट्य पाहायला मिळणार आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून महायुतीमधील मित्रपक्षांना, म्हणजेच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लिहले आहे “भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.” 

हेही वाचा: Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी; महाराष्ट्रातील ‘या’ 33 गावांमधून जाणार मार्ग, तुमचे गाव यामध्ये आहे का?

पुढे रोहित पवार लिहतात, “महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील.” राजकारणात ‘मैत्री’ आणि ‘संधीसाधूपणा’ यातील पुसट रेषा आता स्पष्ट होत असल्याचे चित्र त्यांच्या विधानातून उमटले आहे.

दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या बातम्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ठाकरे गटाच्या खासदारांनीही आपण उद्धव ठाकरेंसोबतच ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या सर्व गोंधळात रोहित पवारांनी टाकलेला हा ‘ट्वीट बॉम्ब’ महायुतीच्या एकसंधपणावर प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे.

आगामी काळात ही भविष्यवाणी खरी ठरते की हा केवळ विरोधकांचा राजकीय डाव आहे, हे येणारा काळच ठरवेल. तूर्त तरी, या विधानामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात एक नवी ठिणगी पडली आहे, हे नक्की! 

हेही वाचा: Weather Update: आता दुपारीची काळजी घ्या! अवकाळीचं संकट गेलं, पण…; आज IMD चा काय इशारा?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number