‘2029 ला अजितदादा मुख्यमंत्री..’; Rohit Pawar यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

लोकांची इच्छा नसली तरी, राजकीय परिस्थितीमुळे बारामतीमध्ये किंवा राज्याच्या राजकारणात 'पवार विरुद्ध पवार' ही लढत अटळ असल्याचे संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत.

‘2029 ला अजितदादा मुख्यमंत्री..’;  Rohit Pawar यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

Rohit Pawar Statement on NCP Merger and 2029 Maharashtra CM : आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका ताज्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण झाले असते, तर 2029 मध्ये अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री 100 टक्के झाले असते. अजितदादांमध्ये पुढाकार घेण्याची मोठी क्षमता होती आणि ते कुटुंबातील तसेच पक्षातील एक महत्त्वाचे नेतृत्व होते, असेही ते म्हणाले. मात्र, आता दादांच्या पश्चात विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत त्यांनी विलिनीकरणाबाबतच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे.

पवार विरुद्ध पवार संघर्षाची शक्यता
रोहित पवार यांनी आगामी निवडणुकांबाबत बोलताना ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना पुन्हा होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. लोकांची इच्छा नसली तरी राजकीय परिस्थितीमुळे बारामतीमध्ये किंवा राज्याच्या राजकारणात ही लढत अटळ असल्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा संघर्ष भविष्यात पाहायला मिळू शकतो, असे सांगत त्यांनी पवारांचे राजकीय वलय संपवण्याचे प्रयत्न काही राज्यकर्त्यांकडून सुरू असल्याचा आरोपही केला. या वक्तव्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी! मंत्र्यांकडे जिल्ह्यांची सूत्रं, संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर; पाहा कोणाकडे कोणता जिल्हा?

विलिनीकरण आणि भविष्यातील पेच
पक्षाच्या विलिनीकरणाबाबत भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, दादांची ही मनापासून इच्छा होती; परंतु, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दादा नसल्यामुळे पक्षात पुढाकार घेणारी मोठी व्यक्ती आता उरली नाही, ज्यामुळे विलिनीकरणाचा विषय आता मागे पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सध्या एकमेकांच्या विरोधात असल्याने भविष्यातही हे अंतर कायम राहण्याची चिन्हे आहेत. एकीकडे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचे वारे सुरू असतानाच रोहित पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number