मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा अराज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून, या सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. खेर कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या निवडणुकांमध्ये राज्यभरातील सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे गेली 5 ते 7 वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर, सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा – BMC Election 2025: मुंबईत सिंगल वोट, इतर महापालिकांत मल्टी वोट; मतदानापूर्वी जाणून घ्या
अशातच आता रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या, असे म्हणायचे का? हा सर्व घटनाक्रम पहिल्यानंतर नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि कोण कोणाचं ऐकतंय हे स्पष्टं होतं”.
पुढे त्यांनी लिहिले की, “लोकशाहीची अशी गळचेपी होताना मात्र आम्ही अनेक कारवाया होऊन देखील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, मात्र अशा एकाधिकारशाहीमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे”.
खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 16, 2025