Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : ‘ब्लॅक बॉक्स जळाला पण आमच्याकडे फोटो…’, अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मराठी माणूस, मराठी नेता, आज आपल्यात नाही. काही झाले तरी लढायचे हे अजित पवार यांनी सांगितले म्हणून आम्ही लढत आहोत. 

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : ‘ब्लॅक बॉक्स जळाला पण आमच्याकडे फोटो…’, अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण सभागृहाने राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी सभागृहाचे वातावरण भावूक झालेले दिसून आले. याचवेळी आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

रोहित पवार म्हणाले की,  “अजित पवार यांच्याशिवाय  हे पहिले अधिवेशन आहे. सर्वात आधी ते यायचे आणि शेवटी पण ते जायचे. चांगले कपडे, शिस्त हे त्यांचे महत्त्वाचे असायचे.. मराठी माणूस, मराठी नेता, आज आपल्यात नाही. काही झाले तरी लढायचे हे अजित पवार यांनी सांगितले म्हणून आम्ही लढत आहोत. 

हेही वाचा – Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेते शोकाकूल, स्व. अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली 

11 वेळ अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला आहे. सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडणार हे अजित पवार आज असते. काही काळ त्यांना अजून मिळाला असता तर मोठं पद म्हणजे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळाले असते.  

हेही वाचा – Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; गुंतवणूकदारांची चांदी, पाहा आजचे ताजे दर

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सुरू आहे.  काय प्रकारचा तपास हा तपास यंत्रणा करत आहेत. यासंदर्भात आम्ही बघू. व्हीएसआर वर काय कारवाई केली जाणार?  ब्लॅक बॉक्स जळाला आहे असं म्हणतात पण आमच्याकडे त्याचा फोटो आला आहे. आम्हाला जर काही काळं बेरं दिसला तर सरकारला महाग पडेल.यासंदर्भात आम्ही बघू. त्यांनी अनेक नियमांचं उल्लंघन केलं आहे. मुख्यमंत्र्यांना मी या अपघाताच्या संदर्भात पत्र देणार आहे आणि या पत्रात मी या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी आणि लवकरात लवकर रिपोर्ट हा समोर आला पाहिजे अशी मागणी केली आहे,  असं रोहित पवार म्हणाले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number