Rohit Pawar on Ajit Pawar Plane crash : अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, ‘VSRला मोठ्या लोकांचा सपोर्ट तर काही लोक सत्तेत…’

त्यानंतर अनेक घटनांची उकल त्यांनी केली होती. अशातच आता रोहित पवार यांनी खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. 

Rohit Pawar on Ajit Pawar Plane crash : अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, ‘VSRला मोठ्या लोकांचा सपोर्ट तर काही लोक सत्तेत…’

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूवर संशयदेखील व्यक्त केला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचे म्हटले जात आहे. अशातच रोहित पवार यांनीदेखील संशय व्यक्त केला आहे. दिल्लीमध्ये जाऊन रोहित पवार यांनी गुप्तहेरांची भेट घेतल्याचेदेखील समोर आले आहे. त्यानंतर अनेक घटनांची उकल त्यांनी केली होती. अशातच आता रोहित पवार यांनी खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. 

रोहित पवार म्हणाले की, “ही जी व्हीएसआर कंपनीला मोठ्या लोकांचा सपोर्ट आहे. यातील काही लोक सत्तेत आहेत. षडयंत्रांचा विचार केला तर हे राजकीय किंवा औद्योगिक षडयंत्र आहे”. 

हेही वाचा – Buldhana News: बुलढाण्यात शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद; महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल 

नंतर ते म्हणाले की, “यामध्ये डीजीसीएच्या मोठ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये  समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच या प्रकरणाला न्याय देऊ शकतात. कारण या प्रकरणात मोठ्या लोकांचा समावेश आहे. मी या निमित्ताने केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा मागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो राम मोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा. राहुल गांधी यांना मी विनंती करतो हे प्रकरण हाती घ्यावं”. असं रोहित पवार पत्रकार परिषदेदरम्याने म्हणाले. 

हेही वाचा – Gold-SIlver Rate Today: सोनं झळाळलं, चांदी नरमली! जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचे ताजे दर 

त्याचप्रमाणे, या पत्रकार परिषदेदरम्याने, रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सवरदेखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की,  “आम्हाला जे ट्रोल करत आहेत जे भाजपासाठी काम करतात ते खूप जास्त बोलत आहेत. आम्ही प्रेझेंटेशन चालू केले तेव्हापासून ते भडकलेले आहेत.  मी कोणत्या फ्लाईटने गेलो होतो, माझ्यासोबत कोणता सेलिब्रिटी होता त्यांच्या आणि माझ्या आधार कार्डची माहिती त्या ट्रोलर्स न मिळत आहे. तर मला वाटतंय की हा सर्व रिसर्च आणि सर्व माहिती दाबण्याचा प्रयत्न करत आहे की, यामध्ये दुसरा कोणता अँगल आहे असा प्रश्न लोकांच्या देखील मनामध्ये येत आहे”,  असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number