Rohit Pawar On West Bengal Election 2026: "महाराष्ट्रात जे छुप्या पद्धतीने केलं ते पश्चिम बंगालमध्ये ऑफिशियल केलं" रोहित पवारांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसली. याचपार्श्वभूमिवर रोहित पवार यांनी पश्चिम बंगाल निकालावर बोलताना भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

Rohit Pawar On West Bengal Election 2026: &quotमहाराष्ट्रात जे छुप्या पद्धतीने केलं ते पश्चिम बंगालमध्ये ऑफिशियल केलं&quot रोहित पवारांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, सुरुवातीच्या कलानुसार राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसली. ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने 149 जागांवर आघाडी मिळवत आपली पकड घट्ट केली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस अवघ्या 92 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या कलानंतर बंगालमध्ये 'सत्तांतरा'ची चर्चा सुरू झाली असून 'दीदी' विरुद्ध 'दादा' या लढतीत भाजपचे पारडे जड होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी पश्चिम बंगाल निकालावर बोलताना भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

हेही वाचा- West Bengal Election 2026: बंगालमध्ये 'कमळ' फुलणार? सुरुवातीच्या कलानं वाढवलं ममतादीदींचं टेंशन, भाजपची बहुमताकडे वेगाने घोडदौड

आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सकाळी कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळे अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. "91 लाख मतदारांना वगळून पश्चिम बंगालमध्ये संविधानाच्या विरोधात कृत्य केले. एवढं करूनही बंगालमध्ये ममता दीदी चांगली लढत देत आहेत. 15 टक्के मतदारांना मतदान करून देता… विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे छुप्या पद्धतीने केले ते पश्चिम बंगालमध्ये ऑफिशियल पद्धतीने केले गेले.

तरीही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी चांगली लढत देत असून यावरूनच भाजप विरोधात किती लोक आहेत हे स्पष्ट होते. पश्चिम बंगालमध्ये जे एस आय आर च्या माध्यमातून जे झाले ते पाहता महाराष्ट्रात एस आय आरच्या माध्यमातून होऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी डोळ्यात तेल घालून चुकीच्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे. तामिळनाडू, आसाम या राज्याची भाजप विरोधातील पक्ष आघाडीवर आहेत. अभिनेते विजय यांना लोकांनी पाठिंबा दिल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे." असं म्हणतं रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number