गुढीपाडवाच्या दिवशी आकाशातून विशालकाय रिंग सिंदेवाही तालुक्यातील जवळच असलेले लाडबोरी गावात पडल्याने एकच खळबळ उडाली होती. ते अवशेष बंद पडलेल्या सॅटेलाईटचे असल्याची माहिती आहे. परंतु अजूनही खात्रीलायक माहिती मिळाली नाही. सोमवारी दुपारी ३-३० वाजता तालुक्यातील अस्वला मेंढा तलावाजवळ मच्छीमाराला आणि पवनपार तसेच मरेगाव आणि गुंजेवाही कोटा येथे पन्द्रा येथे गोळ्यासदृश्य अवशेष मिळाले. हे तिन्ही गोळ्यासदृश्य अवशेष पोलिस ठाणे सिंदेवाहित येथे जमा करण्यात आले आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तज्ज्ञांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.