मुंबईतील रस्ते ठरतायेत जीवघेणे…

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकलसेवा बंद असल्याने कार्यालयात पोहोचण्यासाठी सर्वसामान्यांना रस्तेमार्गे अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. मात्र मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे २०१६ ते २०१९ या कालावधीत रोज सरासरी सहा प्रवाशांनी जीव गमावला आहे, असे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी महापालिकेसह सर्वच यंत्रणेकडून रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींची कामे हाती घेतली जातात. पावसाळ्यात […]

मुंबईतील रस्ते ठरतायेत जीवघेणे…

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकलसेवा बंद असल्याने कार्यालयात पोहोचण्यासाठी सर्वसामान्यांना रस्तेमार्गे अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. मात्र मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे २०१६ ते २०१९ या कालावधीत रोज सरासरी सहा प्रवाशांनी जीव गमावला आहे, असे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी महापालिकेसह सर्वच यंत्रणेकडून रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींची कामे हाती घेतली जातात. पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत, पाणी तुंबणार नाही, असे दावे महापालिका प्रशासन, राजकीय नेते यांच्याकडून केले जातात. या कामांसाठी कोट्यवधींचा खर्च देखील केला जातो. तरी देखील पावसाळ्यात खड्डे आणि पाणी साचण्यापासून आजून हि मुंबईकरांची सुटका झालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number