Ritu Tawde on Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत; महापौरांनी ‘हे’ गंभीर आरोप करत पोलिसांकडे घेतली धाव

संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Ritu Tawde on Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत; महापौरांनी ‘हे’ गंभीर आरोप करत पोलिसांकडे घेतली धाव

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 3 जुलै 2026 रोजी महापौर कार्यालयात बळजबरीने प्रवेश करून परवानगीशिवाय गोपनीय शासकीय कागदपत्रांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

महापौरांनी दिलेल्या तक्रारीची प्रत पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1) तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर मोबाईलद्वारे गोपनीय शासकीय कागदपत्रांचे चित्रीकरण करण्यात आले आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही धमकावल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून महापालिका मुख्यालयात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, किशोरी पेडणेकर यांनी याआधी अशा प्रकारचे आरोप फेटाळून लावत आपण नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यालयात गेल्याचा दावा केला असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number