मुंबई,२६ एप्रिल,प्रतिनिधी : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख हा सातत्याने चर्चेत असतो. रितेशने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. रितेशचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. रितेशचा नुकताच वेड चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे सर्वांनाच वेड लावले. नुकताच रितेशने ईदच्या कलाकारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.ईदच्या या कार्यक्रमात रितेशने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून वेगवेगळ्या फोटो त्याने समाज माध्यमांवर सामायिक केलेआहेत.
या फोटोंमध्ये रितेशची मिशी पाहून चाहत्यांना रितेशचे बाबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची आठवण झाली. ‘रितेश सर तुम्हांला या फोटोमध्ये पाहून साहेबांची आठवण झाली. अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या. तसेच, रितेश फोटोवर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेदेखील कमेंट केली आहे. ‘एकदम चिकने दिसताय रितेश सर.सरांची आठवण आली’ असं लिहीत तेजस्विनीने रितेशचं कौतूक केलं आहे.
एका विशेष मुलाखतीत रितेशला राजकारणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुझे पहिले प्रेम अभिनयावर आहे की राजकारणावर? यावर, रितेश म्हणाला, माझं पहिलं प्रेम हे राजकारण आहे. राजकारणाविषयी आवड आणि आपुलकी कायम असल्याचे रितेशने मुलाखतीत सांगितले. रितेश बॉलिवूड चित्रपटांसह मराठी चित्रपटांमध्येही अभिनय साकारला आहे. लय भारी, माउली या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तंड प्रतिसाद दिला. तसेच नुकताच रितेशने दिग्दर्शित केलेल्या वेड चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली.