ऋषिकेश देशमुखांचा अटकपूर्व जामीन लांबला

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखच्या अडचणीतही वाढ झाली आहे. ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांना आज न्यायालयाने दिलासा दिलेला नाही.   ऋषिकेश देशमुख यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. […]

ऋषिकेश देशमुखांचा अटकपूर्व जामीन लांबला

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखच्या अडचणीतही वाढ झाली आहे. ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांना आज न्यायालयाने दिलासा दिलेला नाही.

  ऋषिकेश देशमुख यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी ऋषिकेशच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  आर्थिक घोटाळाप्रकरणी ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स बजावले होते. ईडीने चौकशीसाठी ऋषिकेश देशमुख यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते ईडी चौकशीला हजर न राहता त्यांनी न्यायालयाचे दार वाजवले. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढी ढकलली असून १२ नोव्हेंबरला ऋषिकेश यांच्या जामीन अर्जाची सुनावणी होणार आहे. तसेच याच प्रकरणी अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number