Indian Cricketer Job: मैदानावर षटकारांची आतिषबाजी, आता प्रशासकीय जबाबदारी; ‘हा’ स्टार भारतीय क्रिकेटर बनला प्रादेशिक क्रीडा अधिकारी, पगार किती मिळणार?

त्यामुळे मैदानावरील आक्रमक फलंदाजीसोबतच क्रीडा व्यवस्थापनातही तो त्याची छाप पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

Indian Cricketer Job: मैदानावर षटकारांची आतिषबाजी, आता प्रशासकीय जबाबदारी; ‘हा’ स्टार भारतीय क्रिकेटर बनला प्रादेशिक क्रीडा अधिकारी, पगार किती मिळणार?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याला उत्तर प्रदेश सरकारकडून मोठा सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्याची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच पार पडलेल्या 2026 च्या टी20 विश्वचषकात विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. त्यामुळे त्याच्या या नियुक्तीची क्रीडावर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

या नियुक्तीनंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे, रिंकू सिंगला या सरकारी पदावर किती वेतन मिळणार? माध्यमांतील अहवालांनुसार, प्रादेशिक क्रीडा अधिकारी या पदासाठी साधारणपणे 70,000 ते 80,000 रुपये मासिक वेतन मिळू शकते. मात्र हे अधिकृत आकडे नसून अंतिम वेतन शासनाच्या नियमांनुसार निश्चित केले जाते.

प्रादेशिक क्रीडा अधिकारी या पदावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या कार्यक्षेत्रातील क्रीडांगणे आणि क्रीडा सुविधांची देखरेख करावी लागते. तसेच राज्य सरकारच्या क्रीडा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, नव्या खेळाडूंच्या प्रतिभेला संधी देणे आणि स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृतीला चालना देणे ही कामेही या पदाचा भाग असतात.

हेही वाचा: Trump Iran Peace Plan: ट्रम्प यांची इराणसाठी '15-कलमी' युद्धविराम योजना; इस्रायलला धक्का, तर तेहरानच्या 'या' अटींनी वाढला पेच

दरम्यान, रिंकू सिंगला आयपीएलमध्येही मोठी जबाबदारी मिळाली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने 2026 च्या आयपीएल हंगामासाठी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तर अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.

रिंकू सिंगने आतापर्यंत आयपीएलमध्ये 59 सामने खेळले असून 52 डावांत फलंदाजी करताना त्याने 30.52 च्या सरासरीने आणि 145.17 च्या स्ट्राइक रेटने 1099 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार अर्धशतके असून त्याचा सर्वोच्च स्कोअर 67 नाबाद असा आहे. 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर तो सातत्याने कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत आहे.

क्रीडाक्षेत्रात दमदार कामगिरी करताना आता प्रशासनातील भूमिकाही निभावण्याची संधी रिंकू सिंगला मिळाली आहे. त्यामुळे मैदानावरील आक्रमक फलंदाजीसोबतच क्रीडा व्यवस्थापनातही तो त्याची छाप पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

हेही वाचा: How to Login EPFO : तुमच्या PF खात्यात कंपनी पैसे भरतेय की नाही? असं तपासा ऑनलाईन पासबुक; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number