‘भाजपकडून सूडाचे राजकरण’ – हसन मुश्रीफ

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज पहाटेपासून मलिकांची ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुले राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपकडून सूडाचे राडकरण सुरू असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नोटीस […]

‘भाजपकडून सूडाचे राजकरण’ – हसन मुश्रीफ

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज पहाटेपासून मलिकांची ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुले राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपकडून सूडाचे राडकरण सुरू असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नोटीस देण्याचा प्रकार सुरू आहे. हे २० वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. कारवाई करायची होती तर त्याचवेळी कारवाई का नाही केली? असा सवाल मुश्रीफांनी उपस्थित केला आहे. गेली दहा वर्षे नवाब मलिक सत्तेत आहेत. तर आता अचानक का? ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, तिथे भाजपकडून कारवाई करण्यात येते, असा आरोप हसन मुश्रीफांनी केला आहे.

राज्यात भाजपला सत्ता गेल्यामुळे अस्वस्थता, वैफल्यग्रस्तामुळे ते असे करत आहेत. भीती घातल्याने सत्ता मिळेल, त्यामुळे ईडीचा वापर करून भाजपकडून सूडाचे राजकारण सुरू असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी  केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number