राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे केंद्र सरकारने नवे अनलॉक निर्बंध जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आजपासून राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील नाट्यगृह, सिनेमागृहे, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या १४ जिल्ह्यांमध्ये ४ मार्चपासून कोरोनावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
राज्यातील सरकारी, खासगी कार्यालये १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी.
शाळा पूर्ण क्षमतेने सुरू.
रेल्वे, बसने प्रवास करताना कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधकारक.
मॉल्स, चित्रपटगृहे आणि इतर ठिकाणी कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक.
मनोरंजन, जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरू.
लग्नसमारंभावरील अटी हटवण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटवर प्रशासनाने निर्बंध घातले होते. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. मात्र, आता मुंबई प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे आजपासून मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासनाने मंजूरी दिली आहे.