‘आधी वापरले, नंतर फेकून दिले!’ कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा

या महिला कर्मचाऱ्याने तिच्या राजीनामा पत्रात तिचा अनुभव सांगितला आणि म्हटले की, 'कंपनीने तिला टॉयलेट पेपरसारखे वागवले. गरज पडल्यास वापरले आणि नंतर कोणतीही काळजी न घेता फेकून दिले.

‘आधी वापरले, नंतर फेकून दिले!’ कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा
Edited Image, X

Resignation Letter on Toilet Paper: कंपन्यांच्या दबावामुळे आणि वाईट वागणुकीमुळे कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात, परंतु अलिकडेच सिंगापूरमधील एका महिला कर्मचाऱ्याच्या राजीनामा पत्राची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या महिलेने आपला राजीनामा कोणत्याही सामान्य कागदावर लिहिला नाही तर टॉयलेट पेपरवर लिहिला आहे. त्यामुळेच तो व्हायरल होत आहे. 

कंपनीने टॉयलेट पेपरसारखे वागवले – 

या महिला कर्मचाऱ्याने तिच्या राजीनामा पत्रात तिचा अनुभव सांगितला आणि म्हटले की, 'कंपनीने तिला टॉयलेट पेपरसारखे वागवले. गरज पडल्यास वापरले आणि नंतर कोणतीही काळजी न घेता फेकून दिले. मी माझ्या राजीनाम्यासाठी या प्रकारचा कागद (टॉयलेट पेपर) निवडला आहे, जेणेकरून तो या कंपनीने माझ्याशी केलेल्या वर्तनाचे प्रतीक बनू शकेल. आता मी ही नोकरी सोडत आहे.' 

हेही वाचा – 2025 मध्ये जगावर ओढावणार मोठं आर्थिक संकट! बाबा वांगाचे भाकीत खरे ठरले का?

हा असामान्य राजीनामा कंपनीच्या संचालक अँजेला योह यांनी स्वतः लिंक्डइनवर शेअर केला. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, हे शब्द माझ्या हृदयाला स्पर्शून गेले. अँजेलाने या घटनेचे वर्णन आत्मपरीक्षणाचा क्षण म्हणून केले आणि हा राजीनामा तिच्यासाठी एक कायमचा धडा ठरला असा विश्वास तिने व्यक्त केला. अँजेलाने म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे म्हणजे त्यांना कंपनीत ठेवणे एवढेच नाही तर त्यांना माणूस म्हणून किती मौल्यवान आहे हे दाखवणे देखील आहे. जर कर्मचाऱ्यांना कमी लेखले जात असेल तर ते कोणत्याही कंपनीसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. 

हेही वाचा – बोईस हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला आणण्याचा गजब कारनामा;सुटकेस उघडताच…

या पोस्टवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, हे आपल्याला आठवण करून देते की आपण आपल्या सहकाऱ्यांना किती महत्त्वाचे वाटवून देतो – कौतुकाचे छोटेसे हावभाव देखील मोठा फरक करू शकतात. दुसऱ्या एका वापरकर्त्याने कमेंट केली, अनेकदा लोक कंपनीमुळे नाही तर मध्यम व्यवस्थापकांच्या वृत्तीमुळे नोकरी सोडतात आणि हे खूप वेळा घडते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number