रानू मंडल यांचं लतादीदींना प्रत्युत्तर

रेल्वे स्थानकावर गाणं गातानाचा व्हिडीओमुळे रानू मंडल यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. लता मंगेशकर यांचं प्रसिद्ध गाणं ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्यामुळे रानू मंडल सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या. हालाखीत जगणाऱ्या रानू मंडल यांना गायक व अभिनेता हिमेश रेशमिया यांच्या येणाऱ्या नविन चित्रपटात गाणं गाण्याचीही संधी मिळाली. मात्र त्यांच्या गायनाबद्दल गानकोकिला लता मंगेशकर यांचं मत […]

रानू मंडल यांचं लतादीदींना प्रत्युत्तर

रेल्वे स्थानकावर गाणं गातानाचा व्हिडीओमुळे रानू मंडल यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. लता मंगेशकर यांचं प्रसिद्ध गाणं ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्यामुळे रानू मंडल सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या. हालाखीत जगणाऱ्या रानू मंडल यांना गायक व अभिनेता हिमेश रेशमिया यांच्या येणाऱ्या नविन चित्रपटात गाणं गाण्याचीही संधी मिळाली. मात्र त्यांच्या गायनाबद्दल गानकोकिला लता मंगेशकर यांचं मत विचारलं असता त्यांनी माझी कुणी नक्कल करू नये, असं विधान करत प्रतिक्रिया दिली होती.

लतादीदींच्या विधानावर आता रानू मंडल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या रानू मंडल?

मी कोणच्याही आवाजाची नक्कल केली नाही. मी माझ्या आवाजात गाणं गायलं आहे. असं उत्तर रानू मंडल यांनी दिलं आहे. त्यांच्या उत्तराचं हिमेश रेशमिया यानेही समर्थन केलंय.

“लता मंगेशकर ह्या खूप मोठ्या गायिका आहेत. त्यांची गाणी ऐकून अनेकांना गायक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. परंतु ते सर्व लोक नक्कल करतात, असं म्हणता येणार नाही”, असं उत्तर म्हणत हिमेश रेशमियांनी रानू मंडल यांना समर्थन दिले आहे.

काय म्हणाल्या होत्या लतादीदी?

रातोरात प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल यांना लता मंगेशकर खोचक सल्ला दिला होता. ‘मी गायलेली गाणी गाऊन माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कोणाचं भलं झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र कोणाची नक्कल करुन मिळणारी प्रसिद्धी दीर्घकाळ टिकत नाही.

गायक व अभिनेत हिमेश रेशमिया यांच्या चित्रपटामधील  रानू मंडल यांनी गायलेले नविन गाण्याचा ट्रेलर लोकप्रिय झाला आहे. तो ट्रेलर प्रेक्षकांना फारच आवडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number