अनिल परब यांना दिलासा

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल परब यांना 20 मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले असून दापोली न्याय दंडाधिकाऱ्यांनी दाखल केलेला गुन्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. दापोलीतील साई रिसॉर्टसंबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोनदिवसांपूर्वी ईडीने सदानंद कदम यांना अकट केली. त्यानंतर अनिल परब यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मंगळवारी […]

अनिल परब यांना दिलासा

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल परब यांना 20 मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले असून दापोली न्याय दंडाधिकाऱ्यांनी दाखल केलेला गुन्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे.

दापोलीतील साई रिसॉर्टसंबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोनदिवसांपूर्वी ईडीने सदानंद कदम यांना अकट केली. त्यानंतर अनिल परब यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली असून मुंबई उच्च न्यायालयाने अनिल परब यांना दिलासा दिला आहे.

मागील अनेक दिवसांपूर्वी अनिल परबांचा दापोलीतील साई रिसॉर्ट चर्चेचा विषय बनला आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी हे प्रकरण तारेवर धरले असून अनिल परबांवर अनेक आरोप केले आहेत. सोमैयांनी या प्रकरणात परबांचं नाव गोवल्यामुळे अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून साई रिसॉर्ट प्रकरणी दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. तसेच, याप्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number