राज्यात विक्रमी 102 रोजगार मेळावे; 27 हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार उपलब्ध

रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी 57 हजार तरुणांनी नोंदणी केली तर 27 हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे.

राज्यात विक्रमी 102 रोजगार मेळावे;  27 हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार उपलब्ध

मुंबई: रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी 57 हजार तरुणांनी नोंदणी केली तर 27 हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे. राज्यातल्या तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअर मध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या उद्देशाने कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील गावदेवी इथल्या शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व शारदा मंदिर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून राज्यात असे शंभर मेळावे आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासाची दूरदृष्टी असलेले आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोहचवणारे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांच्या रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला आहे. या मेळाव्यातून राज्यातल्या हजारो तरुणांचे स्वप्न साकार होत असून उज्जवल भविष्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात यापुढेही असे उपक्रम सुरूच राहतील असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: कल्याणमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणी मुजोर गोकुळ झा याला अखेर अटक

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना खासगी तसेच शासकीय महामंडळात काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विमा, लॉजीस्टिक, व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात  रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. मुंबईतील गावदेवी इथल्या शारदा मंदिर हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 25 आस्थापनांनी सहभाग घेतला यात पाच शासकीय महामंडळाचाही सहभाग होता. तसेच पाचशे युवक युवतींनी या मेळाव्यात नोंदणी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number