राज्यातल्या सर्व शाळांत आता संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर (School time) संविधानाचे (Indian Constitution) संस्कार व्हावेत यासाठी राज्यातल्या सर्व शाळांत संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 26 जानेवारीपासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education in Maharashtra) यांनी या संदर्भात माहिती दिली. सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे CAA, NRC वरून देशभरात वादंग माजलंय. विविध […]

राज्यातल्या सर्व शाळांत आता संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर (School time) संविधानाचे (Indian Constitution) संस्कार व्हावेत यासाठी राज्यातल्या सर्व शाळांत संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 26 जानेवारीपासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education in Maharashtra) यांनी या संदर्भात माहिती दिली.

सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे

CAA, NRC वरून देशभरात वादंग माजलंय. विविध आंदोलनं सुरू आहेत.

या कायद्याविरोधात 1100 ठिकाणी आदोलनं सुरू आहेत.

हा कायदा संविधानविरोधी असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

या उपक्रमानुसार शाळांमध्ये दररोज प्रार्थनेप्रमाणे संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन होईल.

संविधानाच्या उद्देशिकेत असणारी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची मूल्यं विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून रुजवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येतोय.

समता, स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता ही पंचसूत्री विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच अंगीकारता यावी, हा या उमक्रमामागील हेतू आहे.

यापूर्वी फेब्रुवारी 2013 साली सर्व शाळांत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number