मंत्रिमंडळविस्तारानंतर खातेवाटप होण्यापूर्वीच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याबद्दल आणि त्यांच्या कारणांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी त्यावर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
“अजून ज्यांच्या नावाचं खातं म्हणून घोषणा झाली नाही त्यानी का राजीनामा दिला हे मला महित नाही,पण ही चुणूक आहे. हे पाच वर्षे सरकार चालवायचं म्हणतात ते कसं चालवणार? लग्नाला नवरदेव बोहल्यावर उभा राहण्याआगोदर पळून जाण्याची स्थिती आज आहे.” अशा शब्दांत भाजप खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तर पदापेक्षा काम महत्त्वाचं आहे, काम कसं करता येईल याकडे अब्दुल सत्तार लक्ष द्यावे, असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अब्दुल सत्तार यांना दिला. तीन पक्षाचे सरकार असल्याने सत्तार यांनी घाई करू नये, पदापेक्षा आपल्याला काम कोणती आहे हे सुद्धा पहायला हवं, असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सत्तार यांना दिला.
शिवसेना- काँग्रेसचे अनेक मंत्री आणि आमदार नाराज असून अब्दुल सत्तारां प्रमाणे अनेक मंत्री आमदार राजीनामा देतील आणि हे सरकार पडेल असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय.
काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तार सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार
सत्तार यांची तिसऱ्यांदा विधानसभेवर निवड
सत्तार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री होते
आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
मराठवाड्यातील काँग्रेसचा आक्रमक चेहरा असा सत्तार यांचा लौकीक
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत चार महिन्यांपूर्वी सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता
सत्तारांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा अनिल देसाईंकडे दिलाय. मात्र सत्तारांनी राजीनामा दिल्याचं वृत्त देसाईंनी फेटाळून लावलंय.