बंगळूर: आयपीएल 2026 मध्ये रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने गुजरात टायटन्स वर 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह बंगळूरने हंगामातील पाचवा विजय नोंदवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. साई सुदर्शनच्या शतकीय खेळी असूनही गुजरातला पराभव टाळता आला नाही.
बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत 205 धावांचा मोठा स्कोअर उभा केला. साई सुदर्शनने 58 चेंडूंमध्ये 100 धावांची शानदार खेळी करत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे गुजरातने भक्कम धावसंख्या उभारली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळूरची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. जेकब बेथेल लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी जबरदस्त भागीदारी करत सामन्याचा रंग बदलला. दोघांनी मिळून 59 चेंडूंमध्ये 115 धावांची भागीदारी केली. पडिक्कलने अवघ्या 20 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत 27 चेंडूंमध्ये 55 धावा केल्या, तर कोहलीने 44 चेंडूंमध्ये 81 धावांची झंझावाती खेळी साकारली.
You can put your faith in him when its a run chase ? Virat Kohli reaches another #TATAIPL fifty ? Updates ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#KhelBindaas | #RCBvGT pic.twitter.com/zJlUA70Udp — IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
या शानदार खेळीच्या जोरावर विराट कोहलीने पुन्हा एकदा आयपीएल 2026 मधील ‘ऑरेंज कॅप’ त्याच्या नावावर केली आहे. त्याची ही खेळी संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने आक्रमक आणि संयमी खेळाचा उत्कृष्ट संगम दाखवला.
मात्र सामना पूर्णपणे एकतर्फी राहिला नाही. एकवेळ बेंगळुरूचा स्कोअर 1 बाद 141 असा होता, तेव्हा विजय अगदी सहज वाटत होता. पण अचानक 16 चेंडूंमध्ये 4 गडी गमावल्याने संघ अडचणीत सापडला. तरीही क्रुणाल पांड्या आणि टिम डेविड यांनी संयम राखत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. क्रुणाल पांड्याने 12 चेंडूंमध्ये 23 धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली, तर टिम डेविड 10 धावांवर नाबाद राहिला. अखेरीस बेंगळुरूने 7 चेंडू राखून हा सामना जिंकत शानदार पुनरागमन केले.
Clinical at home…Again! ❤️@RCBTweets jump to 2⃣nd spot on the points table with another win in front of a roaring Bengaluru crowd ? Scorecard ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvGT | @RCBTweets pic.twitter.com/pYTwF4yzbo — IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
एकूणच, विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे बंगळूरने मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.