रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम राहणार

मुंबई, १० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तिसरे २ महिन्यांसाठीचे पतधोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन पतधोरणाची माहिती दिली. याआधी एप्रिल-मे या २ महिन्यांसाठी पहिले तर जून-जुलै या २ महिन्यांसाठी दुसरे पतधोरण जाहीर करण्यात आले होते. तिसऱ्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६.५ […]

रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम राहणार

मुंबई, १० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तिसरे २ महिन्यांसाठीचे पतधोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन पतधोरणाची माहिती दिली. याआधी एप्रिल-मे या २ महिन्यांसाठी पहिले तर जून-जुलै या २ महिन्यांसाठी दुसरे पतधोरण जाहीर करण्यात आले होते. तिसऱ्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे जाहीर केले. यामुळे कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मागच्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.५ टक्क्यांची वाढ केली. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातही रेपो रेट वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये बदल केलेला नाही. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात सलग ३ वेळा २ महिन्यांसाठीच्या पतधोरणात रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number