रवींद्र वायकरांना दिलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला

रवींद्र वायकरांना दिलासा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबचे कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे. गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचे अहवालात नमूद आहे. माजी मंत्री रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी आणि आता विधानसभेच्या उमेदवार असलेल्या मनिषा वायकर यांच्यासह काही जणांवर जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण मुंबई महापालिकेने वायकर यांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं नुकत्याच सादर केलेल्या अहवालात नमूद केले. आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला. हा अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number