Ravindra Chavhan on Ajit Pawar : ‘आम्ही जर बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण निर्माण होईल’, रविंद्र चव्हाणांचा घणाघात

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.  

Ravindra Chavhan on Ajit Pawar : ‘आम्ही जर बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण निर्माण होईल’, रविंद्र चव्हाणांचा घणाघात

सध्या राज्यभरात महापालिकेच्या निवडणूकांचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याचा, पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यातच अनेक नेतेमंडळीदेखील एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार फटकेबाजी केली. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.  

यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, “नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेलं एनडीए सरकार आणि राज्यातले महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असाव याचं उदाहरण सेट करत आहोत.  कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेल्या. आता ही निवडणूक होत आहे.  मागील वर्षानुवर्ष पुण्यात ज्या गतीमान पधतीने नरेंद्र मोदींच सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहेत. infrastruture ला कामाला गती दिली जात आहे. कोट्यवधी रुपये दिले जात आहे 

महापालिकेच्या स्थापनाच्या वेळेपासून स्वप्न साकार करायचं असेल तर त्या दिशेने पावलं उचलली पाहीजे. पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव महापालिकेत झाला त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्ता असताना सुधा महाविकास आघाडीला मेट्रो सुरू करता आले नाही त्यांनी चालू केलेच नाही. त्यांना करायचे नव्हते. त्यांनी सगळं काही केलं नाही. मोदींचा सरकार आल्यावर मेट्रो सुरु झाली ३३ किलोमीटरचे मेट्रो जाळ झाल आहे. 

त्याचबरोबर अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की,  “अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाक के देखना चाहिए”. आता या विषयावरून राजकारण अधिक तापणार की कोणतं वळण घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number