प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडनने मंगळवारी शिर्डीत येवून साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘मी लहानपणापासून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे’, असे सांगितले. यावेळी साईबाबा संस्थानाच्यावतीने रविना टंडन यांचा शाल देऊन सन्मानही करण्यात आला आहे.
अभिनेत्री रविना टंडन शिर्डी साईबाबा चरणी नतमस्तक झाल्या. २०२३ या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात साईबाबांच्या दर्शनाला आली. आणि साईबाबांचे मनोभावे दर्शन घेते आहे. अनेक हिंदी चित्रपटामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत रविना टंडन यांनी अभिनय केलाय. लाखो प्रेक्षकांच्या मनावर रवीनाने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आज शिर्डी येथे येऊन रविना टंडन यांनी साईबाबांचे दर्शन घेतले.
साईबाबांना धन्यवाद देण्यासाठी रविना टंडन दर्शनाला आली आहे. खूप अशा गोष्टी घडल्या आहेत ज्या वेळेला साईबाबा माझ्या मदतीसाठी प्रकट झाले आहेत. बाबाने जी काम करण्यासाठी शक्ती दिली आहे, प्रत्येक समस्येचा, परीक्षेचा सामना करण्यासाठी त्यांनी जी ताकत दिली आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आहे आली आहे असाही रविना टंडन म्हणाली.