३२ वर्षाच्या तरुणाने अर्थात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झाली आहे. याचेच परिणाम म्हणून वरळीतील एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे न येता अवघा लवाजमा घेऊन येत आहेत. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन येत आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. वरळी कोळीवाडा येथील मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
‘सध्या सरकारचे सत्कार समारंभ आणि लग्न सोहळे सुरू आहेत. वरळी मतदारसंघात ३२ वर्षाच्या आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिले. आता वरळी मध्ये मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पण घेऊन येत आहेत, मुख्यमंत्री पोलीस घेऊन येणार पण त्यांनी राजीनामा देऊन यायला हवं, आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहू, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
मुळात भाजपला मध्ये पडण्याची गरज नाही. याला चोमडेपणा म्हणतात, स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही मोदींची माणसं आहोत, असं म्हणाले आहे. त्यामुळे मोदी सेना येणार आहे. त्यामुळे भाजपने यात उतरू नये, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.