रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वर्चस्वाच्या लढ्याभोवती केंद्रित आहे. महायुती (भाजप-शिंदे शिवसेना) विरुद्ध महाविकास आघाडी (ठाकरे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी) असा सामना रंगला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या 6 लाख 8 हजार 993 असून पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 64 हजार 976 आहे. मागील निवडणुकांतील मतदान टक्केवारी पाहता महिला मतदारांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
एकूण मतदार: ११,७३,८९९
मतदान केंद्रे: १,६९३
निवडणूक कर्मचारी: ५,४५५
एकूण उमेदवार:
जिल्हा परिषद गट – १५१
पंचायत समिती गण – ३२१
रत्नागिरी जिल्ह्यातील आतापर्यंतचे जिल्हाध्यक्ष (नावं आणि पक्ष)
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर सुरुवातीला काँग्रेसचा प्रभाव होता, मात्र ९० च्या दशकानंतर शिवसेनेने येथे आपली पाळेमुळे घट्ट केली. यात काही प्रमुख नावे पुढील प्रमाणे:
विठ्ठलराव साळवी (काँग्रेस)
बापूसाहेब खेडेकर
उदय सामंत (राष्ट्रवादीत असताना अध्यक्ष होते)
स्नेहा सावंत (शिवसेना)
रोहन बने (शिवसेना)
विक्रांत जाधव (शिवसेना – शेवटचे निवडून आलेले अध्यक्ष)
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत कोणत्या पक्षाचं किंवा युती आघाडीचं प्राबल्य
रत्नागिरी जिल्ह्यात १९६० ते १९९० या कालावधीत राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर १९९५ ते आतापर्यंत शिवसेनेचा (अविभाजित) गड सत्तेत आले. विशेषतः कोकणचे वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांमुळे येथे शिवसेनेची सत्ता राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा चिपळूण आणि संगमेश्वर भागात काही काळ प्रभाव राहिला आहे. त्यानंतर २०२४-२५ च्या राजकीय बदलांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र बदलले आहे.
आगामी निवडणूकांसाठी महायुती: शिवसेना (एकनाथ शिंदे गट),भाजप आणि रिपाई अशी आहे.
युतीतून राष्ट्रवादी (अजित पवार गट).स्वतंत्र लढत आहे.
महाविकास आघाडी:तील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट).
जिल्ह्यातील आव्हानं
प्रमुख लढती आणि कोणत्या पक्षाचे उमेदवार रिंगणात
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत खालील ठिकाणी चुरस पाहायला मिळू शकते: