Ramdas Athawale Tweet: ‘आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत’, रामदास आठवलेंनी नेमका कोणावर साधला निशाणा?

राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महत्त्वाचे विधान केले आहे.

Ramdas Athawale Tweet: ‘आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत’, रामदास आठवलेंनी नेमका कोणावर साधला निशाणा?

राज्यातील आणि केंद्रातील राजकीय समीकरणांमध्ये सध्या विविध चर्चा सुरू असून संभाव्य आघाड्या, बदल आणि राजकीय हालचाली यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आठवले यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महत्त्वाचे विधान केले आहे.

त्यांनी लिहिले की, ‘आपला RPI पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. ‘आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत’ पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही. विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेलाच पाहिजे’.

पुढे त्यांनी लिहिले की, ‘ज्या काळात भाजप-शिवसेनेसोबत इतर कोणतेही नेते आणि पक्ष येत नव्हते, त्या कठीण काळात आपला RPI पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. भाजप-शिवसेनेच्या युतीसोबत जेव्हा आपली RPI ची ताकद जोडली गेली, तेव्हाच खऱ्या अर्थाने या युतीची ‘महायुती’ झाली आहे. आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून, आपला पक्ष देशभरात वेगाने वाढत आहे’. 

नंतर त्यांनी लिहिले की, ‘भविष्यात आपल्या पक्षाला कोणीही गृहीत धरू नये आणि सत्तेत आपला हक्क व सन्मान अबाधित राहावा, यासाठी आता RPI च्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने व नव्या जोमाने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे’.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number