#CAA, #NRC च्या समर्थनार्थ 500 फुटांचा तिरंगा घेऊन मोर्चा

केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) व एनआरसीच्या (NRC) समर्थनार्थ अमरावतीमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले. भाजप, हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा काढून नागरिकत्व कायदा आणि NRC चं समर्थन केलं. एकीकडे केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं होत असताना दुसरीकडे आता CAA आणि NRC च्या समर्थनार्थदेखील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू लागले […]

#CAA, #NRC च्या समर्थनार्थ 500 फुटांचा तिरंगा घेऊन मोर्चा

केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) व एनआरसीच्या (NRC) समर्थनार्थ अमरावतीमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले. भाजप, हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा काढून नागरिकत्व कायदा आणि NRC चं समर्थन केलं.

एकीकडे केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं होत असताना दुसरीकडे आता CAA आणि NRC च्या समर्थनार्थदेखील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू लागले आहेत.

26 डिसेंबर रोजी अमरावतीमध्ये भाजप (BJP) आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून नागरिकत्व कायदा आणि एनआरसीचे समर्थन करण्यात आलं.

शहरातील नेहरू मैदान येथून हा मोर्चाला सुरूवात झाली. शहरातून परत नेहरू मैदान येथे मोर्चाची समाप्ती करण्यात आली.

‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’ आदी घोषणा देत हा मोर्चा निघाला.

500 फुटाचा तिरंगा, भगवे झेंडे, तिरंगी झेंडे घेवून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता.

मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकासोबत अनेक संघटना देखील सहभागी झाल्या.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number