PM Modi In Rajya Sabha: राज्यसभेतील निरोप समारंभ; ‘राजकारणात पूर्णविराम नसतो’, पंतप्रधान मोदींनी खासदारांना दिले अनुभवाचे धडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला अनुभव आणि ज्ञानाचे व्यासपीठ असल्याचे सांगत निवृत्त होत असलेल्या सदस्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

PM Modi In Rajya Sabha: राज्यसभेतील निरोप समारंभ; ‘राजकारणात पूर्णविराम नसतो’, पंतप्रधान मोदींनी खासदारांना दिले अनुभवाचे धडे

नवी दिल्ली: संसदेचे उच्च सभागृह असलेल्या राज्यसभेतील 37 खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने आज बुधवारी 18 मार्च 2026 रोजी सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. अलीकडेच या 37 जागांसाठी नव्या सदस्यांची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे काही खासदार पुन्हा नव्या कार्यकाळासाठी सभागृहात परतणार आहेत, तर काही नवे चेहरे सुद्धा राज्यसभेत सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित केले.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात राज्यसभेला ज्ञान आणि अनुभवाचे मोठे व्यासपीठ असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या सभागृहात प्रत्येक सदस्याचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. राज्यसभा हे जणू एक मोठी विद्यापीठच आहे, जिथे शिक्षणही मिळते आणि अनुभवाची दीक्षाही मिळते.

नवीन खासदारांनी वरिष्ठ सदस्यांकडून शिकण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. राजकारणात पूर्णविराम नसतो, असे सांगत त्यांनी निवृत्त होत असलेल्या खासदारांच्या योगदानाचे कौतुक केले.

हेही वाचा: Shinde-Thackeray Shiv Sena Yuti : मोठी अपडेट समोर! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चांना बळ

पंतप्रधानांनी निरोप देताना सांगितले की, सभागृहात अनेक विषयांवर चर्चा होत असते आणि प्रत्येक सदस्य त्यात महत्त्वपूर्ण योगदान देतो. या प्रवासात काही गोड-कडू अनुभवही येतात. मात्र अशा निरोपाच्या क्षणी सर्वांनी पक्षीय भेद विसरून एकत्र येणे आवश्यक असते. अनेक खासदार येथे मिळालेला अनुभव घेऊन पुढे समाजकार्यात आणि सार्वजनिक जीवनातही महत्त्वाची भूमिका बजावत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काही वरिष्ठ नेत्यांचा विशेष उल्लेखही केला. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे त्यांनी कौतुक केले. या नेत्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ संसदीय कामकाजाला दिला असून त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. इतका दीर्घ संसदीय प्रवास करणे ही लहान गोष्ट नसून त्यातून समर्पण आणि लोकसेवेची भावना दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सभागृहाला संबोधित केले. त्यांनी सांगितले की राजकारणात असलेले लोक कधीही खऱ्या अर्थाने निवृत्त होत नाहीत. नेता ना थकतो, ना निवृत्त होतो. स्वतःला राजकारणात 54 वर्षे झाली असून आजही शिकण्याची गरज वाटते, असे सांगत त्यांनी संसदीय लोकशाहीतील अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा: EPFO Pension Application: ‘PF क्लेम’ वारंवार रिजेक्ट होतोय? अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ नियम तपासा, अन्यथा हक्काचा पैसा मिळणे कठीण होईल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number