राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या डिसेंबर 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 (अ) मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका अफरोज महमंद झारी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांचे इतर मागास वर्ग (नाभिक) जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जारी केले. त्याबाबतचे पत्र बुधवार, 29 जुलै रोजी राजापूर नगर परिषदेला प्राप्त झाले असून त्यामुळे नगर परिषदेतील एक जागा रिक्त झाली आहे. यापूर्वी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अफरोज झारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. विशेष म्हणजे, त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या निलोफर मुकादम यांचेही जात प्रमाणपत्र समितीने अवैध घोषित केले होते.
हेही वाचा : BJP News: भाजपाला मोठा धक्का? बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा ; कारण अद्याप अस्पष्ट
जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरसेविका अफरोज झारी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश राजापूर नगर परिषदेला पाठविले. हे पत्र बुधवारी नगर परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. राजापूर नगर परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षांसह महाविकास आघाडीकडे 10 नगरसेवक आणि एक स्वीकृत सदस्य असे संख्याबळ आहे