मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेनझींच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेचा निषेध करतानाच त्यांनी भाजपच्या ट्रोल संस्कृतीवरही जोरदार निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालचा व्हिडिओ पाहिला. त्यात त्यांनी आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेली भाषा चुकीची असल्याचे म्हटले. मीही त्याच्याशी सहमत आहे. कोणत्याही व्यक्तीविरोधात अशा प्रकारची खालच्या पातळीची भाषा वापरली जाऊ नये. मात्र, पंतप्रधानांनी हा संदेश आपल्या पक्षातील नेत्यांनाही आणि कार्यकर्त्यांनाही द्यायला हवा.” या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांनी आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांना माफ करणार असल्याचंही बोलले. आता याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
पुढे ते म्हणाले की, नीटचा पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार? त्यानी त्यांचे जीव गमावले आहेत, पालकांनी आपल्या मुलांना गमावलं आहे. त्यांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.