Raj Thackeray : ‘कल्याण-डोंबिवलीमधील राजकारणाने शिसारी आली…’, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त षन्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले. त्यावेळी संजय राऊत आणि अमित ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.  बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनामध्ये मी एक लेखही लिहिला आहे. बाळासाहेबांना […]

Raj Thackeray : ‘कल्याण-डोंबिवलीमधील राजकारणाने शिसारी आली…’, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त षन्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले. त्यावेळी संजय राऊत आणि अमित ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनामध्ये मी एक लेखही लिहिला आहे. बाळासाहेबांना कसं पाहायचं, त्यांना कसं मांडायचं हा प्रश्न अनेकदा उभे राहतो. हिंदुहृदयसम्राट, व्यंगचिककार, राजकारणी असे अनेक पैलू आहेत. बाहेर अनेक काही घडायचं, पण बाळासाहेब व्यंगचित्र रेखाटताना त्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर उमटत नसायचा."

बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते, ते कुणालाही समजले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर मला व्याख्यान द्यायला आवडेल असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. आज राज्यात, कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे शिसारी आली. 

राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय की बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते? अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number