मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये मुस्लिम समाजावर आगपाखड केली, तसंच CAA चं समर्थनही केलं. (Raj Thakceray supports CAA) या सर्व विषयावर आणि रजा अकादमीचे प्रमुख मोईन मियाँ यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भेटीबद्दल समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आमचं सरकार असतं तर त्यांना जेलमध्ये टाकलं असतं. राज ठाकरे समाजामध्ये भांडण लावायचं काम करतात.
RSS आणि BJP ला जे काही अपेक्षित आहे ते सर्व आता राज ठाकरे करतील.
लोकसभेला BJP विरोधात मोहीम काढली, आणि आता भाजपने शिवसेनेशी संबंध तोडल्यावर मनसे लगेच भाजपबरोबर गेली.
राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारलं. आता त्यांचा पुळका आला आहे. हे सर्व नाटक आहे. त्यांचं स्वतःचं आता काहीच अस्तित्व राहिलं नाही हे राज ठाकरेंना पक्कं माहीत झालं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला आहे, ते हे सरकार अजून 15 वर्ष चालवतील.
मोईन मियाँला मुख्यमंत्र्यांनी भेटायची गरज नव्हती, तो खोटारडा माणूस आहे, मुसलमानांची टोपी घालून तो सर्व पक्षांसोबत फिरतो आणि स्वतःला मुसलमानांचा नेता म्हणवून घेतो. पण तो फार लबाड माणूस आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बसणाऱ्या माणसाबद्दल पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना कल्पना द्यायची असते. ते पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना मोईन मियाँबरोबर बसवलं, तर यात मुख्यमंत्र्यांची चुकी नाही.