Raj – Uddhav Thackeray : मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होणार?; राज-उद्धव भेटीने वाढली उत्सुकता

ही भेट पूर्णपणे राजकीय असल्याचे मनसेनेही स्पष्ट केले असून जागावाटप आणि युतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Raj – Uddhav Thackeray : मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होणार?; राज-उद्धव भेटीने वाढली उत्सुकता

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकीय तापमान वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे पोहोचल्याची माहिती मिळत असून या दोन नेत्यांच्या भेटीने नव्या युतीच्या चर्चांना आता वेग आला आहे. उद्धव ठाकरे हे दादर येथील शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहचले आहेत. गेल्या काही दिवसांत दोघांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आरक्षण सोडतीनंतरच ही शक्यता अधिक बळकट झाली होती आणि आजच्या भेटीत जागावाटपावर महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

या भेटीसाठी परिसरात मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. यापूर्वी ‘सत्याचा मोर्चा’, कौटुंबिक कार्यक्रम किंवा वैयक्तिक भेटींच्या निमित्ताने हे दोघे एकत्र दिसले होते; परंतु निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट वेगळ्या राजकीय समीकरणांची चिन्हे दाखवत आहे. राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (UBT) गट जर एकत्र आला, तर ही युती भाजपसह इतर पक्षांसाठी मोठे आव्हान ठरू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

हेही वाचा: Delhi Blast Update: दिल्लीपेक्षाही मोठा स्फोट घडवण्याचा कट फसला; मुझम्मिलच्या कबुलीजबाबातून उलगडले दहशतवादी मॉड्युलचे गुपित

मनसे महाविकास आघाडीत सामील होणार की स्वतंत्र रस्ता निवडणार, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र, महाविकास आघाडीला बाजूला ठेवून राज–उद्धव एकत्र आले, तर राज्याच्या आगामी राजकारणात नवा सस्पेन्स तयार होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत असताना या दोन नेत्यांची एकत्र येणारी राजकीय हालचाल खूप महत्त्वाची मानली जाते.

मनसे नेते योगेश चिले यांनीही या भेटीबाबत भाष्य करताना ही भेट पूर्णपणे राजकीय असून निवडणुकांच्या दृष्टीनेच ती महत्त्वाची असल्याचे सांगितले. “निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांची भेट म्हणजे निश्चितच काहीतरी राजकीय हेतू आहे,” असे ते म्हणाले. एकूणच, आजच्या या महत्त्वपूर्ण भेटीतून काही नवी घोषणा किंवा औपचारिक संकेत मिळतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याचा थेट परिणाम आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या समीकरणांवर दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Hema Malini’s Emotional Tribute To Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी पहिल्यांदाच झाल्या व्यक्त , म्हणाल्या, ‘ते माझ्यासाठी सर्वकाही…’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number