Raj Thackeray: युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही

12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray: युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही

मुंबई: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या किल्ल्यांचा महिमा जगभरात ज्ञात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्याचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा आहे. युनेस्कोचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील. युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं असेही त्यांनी सांगितले आहे. 

राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच या 12 किल्ल्यांमध्ये 11 किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडूमधला आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल असेही राज यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा: सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढणार आणि जिंकणार; ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पुढे बोलताना, या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील, पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा असे राज यांनी म्हटले. तसेच आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो. मी आम्ही हे गेली अनेक वर्षे म्हणत आलो आहे की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन केलं आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल असेही त्यांनी सांगितले. 

राज ठाकरे म्हणाले, "असो, फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं… जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो 2009 ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात – धर्म पहाण्याची गरज नाही !" 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number